1

!! वीरशैव कक्कय्या ढोर समाज या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !!

3

१)मा.श्री.रमाकांत नारायणेसाहेब.(एस.इ).रहिमतपूर संपर्क-९९८७८९२०६३. २)श्री.दिपक पोपटराव कळंबे.येवला (नाशिक).संपर्क-९७३०५६७५४३ Email Id:- dhorsamaj@gmail.com / kakkayasamaj@gmail.com

4

कक्केरी निवासी महाप्रसादी श्री संत वीरशैव कक्कय्या महाराज

श्री कक्कया स्वामी गुरुराज वर्यम । वीरशैव धर्म हितस्य दक्षम ॥

कक्करी क्षेत्र निवासीनम त्वम । नमामी अनुभवमन्टपम वरिश्टम ॥

शरण कार्य कल्पद्रुम गुरु सार्वभौम । श्री कक्केरीधीराज महाप्रसादी ॥


Click here(नाव नोंदणी सुरू आहे.​)

कक्केरी दर्शन.

धर्मगुरु लिंगायत संत कक्कय्या महाराज.

कक्कय्य : (सु. १२ वे शतक). कर्नाटकात होऊन गेलेला एक वीरशैव संत. तो जातीने ढोर असून मूळचा माळव्याचा (मध्य प्रदेश) रहिवासी होता. ⇨बसवेश्वरांच्या वीरशैव पंथाची कीर्ती ऐकून तो बसवकल्याण येथे गेला व ⇨ वीरशैव पंथ स्वीकारून त्याने पंथप्रचाराचे भरीव कार्य केले. वीरशैव पंथात त्याला उच्च स्थान आहे. स्वत: बसवेश्वर त्याला आपला आजोबा मानीत. ‘कायकवे कैलास’ ह्या वीरशैव तत्त्वास अनुसरून बसवकल्याण येथेही तो आपला परंपरागत व्यवसाय करून चरितार्थ चालवी. चेन्नबसवांसोबत उळवीस (जि. कारवार) जात असता, वाटेत कक्केरी येथे त्याने समाधी घेतली. त्याची काही कन्नड ‘वचने’ उपलब्ध आहेत. त्याचे अनुयायी कर्नाटकात व महाराष्ट्रात असून ते ‘कक्कय्य समाज’ या नावाने ओळखले जातात.

ज्या ठिकाणी शरण कक्कया लिंगैक्य झाले त्या ठिकाणी त्यांची समाधी बांधण्यात आली आहे. समाधीच्या बाजूस कक्कायाचे तळे व कक्कायाची विहीर सुद्धा आहे. तेथे कक्कया  बाबत माहिती देणारा शिलापट सुद्धा आहे व त्याच ठिकाणी कक्कयांचा नावे 'कक्केरी' हे गाव सुद्धा वसलेले आहे. समाधीच्या स्थळी महाशिवरात्रीस मोठी महायात्रा भरते व लिंगायत समाज व कक्कया समाज मोठया संखेने महायात्रेस हजर असतो व सामुदायिक भोजनाचा मोठा कार्यक्रम होऊन प्रसाद दिला जातो.
तेथे आज मितीस अपल्या समाज्याने एक सभागृह बांधले असून एक जंगम पुजारीही तेथे ठेवला आहे. तेथे समाज्याने पाण्यासाठी बोअरवेल खोदली असून बेळगाव येथील श्रेयकर बांधव व त्याची कमिटी त्याची निगा राखत आहे. अनेकांची कित्येक वर्षापासून इच्छा आहे कक्केरी कक्कया समाज्याची पंढरी व्हावी. परंतु यातून अजून मार्ग निघालेला नाही.

कक्केरी निवासी महाप्रसादी श्री संत वीरशैव कक्कय्या महाराज
श्री कक्कया स्वामी गुरुराज वर्यम । वीरशैव धर्म हितस्य दक्षम ॥
कक्करी क्षेत्र निवासीनम त्वम । नमामी अनुभवमन्टपम वरिश्टम ॥
शरण कार्य कल्पद्रुम गुरु सार्वभौम । श्री कक्केरीधीराज महाप्रसादी ॥


गुगल नकाशा 
कक्केरी, ता.-खानापूर, जि.बेळगाव, कर्नाटक 

कक्केरी गाव कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यात असून खानापूर तालुक्यात आहे. मुंबईहून चालुक्य एक्सप्रेस  दादर (२१.३० hr.)  (११०१७)या रेल्वेने जाता येते. अलनावर रेल्वे स्टेशनवर उतरून कक्केरीला जाता येते. तेथून कक्केरी ११ कि.मी. वर आहे.अलानावर ते कक्केरी - ११कि.मी.बेळ्गाव ते कक्केरी  - ४७.२०    कि.मी. खानापूर ते कक्केरी  - २८.२०   कि.मी.
मुंबई ते खानापूर- ५११  कि.मी.  

बेळगावहून महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा एस टी महामंडळाच्या गोव्याला जाणारया बसने कक्केरीला जाता येते. किंवा जास्त व्वक्ती असल्यास स्वतंत्र गाडी करूनही (दिवसाला रु.१८०० ते २०००) जाता येईल.
कक्केरीला सभागृह बांधले आहे. पाण्यासाठी बोअर आहे. स्नानगृह व स्वच्छतागृह आहे. परंतु या सोयी कमी पडतात. कक्केरीला रहावयाचे असल्यास बहुदा पटांगणातच झोपावे लागते. बेळगावला राहून जाणे येणे करणे सोयीचे होईल. त्यामुळे कक्केरीचा विकास व्हायचा झाल्यास समस्त ढोर समाज्याने मदत करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क -  श्री किशोर श्रेयकर  - ०९४४८१५७४५६ 
                                        श्री निजगुणी पोळ   - ०९४४८३०१७८४
 श्री संत महाप्रसादी कक्काय्यांचे मंदिर

श्री संत महाप्रसादी कक्काय्यांची मंदिरातील मूर्ती 

श्री संत महाप्रसादी कक्काय्यांची मंदिरातील मूर्ती


श्री संत महाप्रसादी कक्काय्यांच्या मंदिरातील मूर्ती सोबत जंगम पुजारी

श्री संत महाप्रसादी कक्काय्यांच्या मंदिरातील आवारात असलेल्या शिलापटा सोबत कक्कय्या अभ्यासक श्री. शंकर मिरजी पोळ,बेळगाव 
 

श्री संत महाप्रसादी कक्काय्यांच्या मंदिराच्या आवारातील गुफा 

  
श्री संत महाप्रसादी कक्काय्यांच्या मंदिराच्या आवारातील देवीची मूर्ती

 श्री संत महाप्रसादी कक्काय्यांच्या जुन्या मंदिरातील अवशेष



श्री संत महाप्रसादी कक्काय्यांच्या मंदिराच्या आवारातील वीरगळू 

श्री संत महाप्रसादी कक्काय्यांच्या मंदिराच्या आवारातील श्री गणेशाची मूर्ती 

श्री संत महाप्रसादी कक्काय्यांच्या मंदिराच्या आवारातील सभागृह 

श्री संत महाप्रसादी कक्काय्यांच्या पालखी सोबत जंगम पुजारी

श्री संत महाप्रसादी कक्काय्यांच्या मूर्तीला पुजे पुर्वी स्नानविधी 

श्री संत महाप्रसादी कक्काय्यांच्या मूर्तीची पुजा सुरु असताना  

भजन 

कक्कय्या समाज्यातील विचारवंतांचे मंथन 

कक्कय्या समाज्यातील विचारवंतांचे मंथन 


मा.श्री.रमाकांत नारायणे, रहिमतपूर.( यांचा ईमेल द्वारा प्रकाशित )


किती लोक हा ब्लॉग वाचतात पहा. माझ्या संकेतस्थळाला वाचकांनी दिलेल्या भेटी.

आपणास वीरशैव कक्कय्या (ढोर) समाज या ब्लॉगची विस्तृत माहिती मिळण्याचे माध्यम कोणते?